Pimpri : मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त मानवी साखळी व रॅलीचे आयोजन

एमपीसी न्यूज – आयोध्या येथे आज (सोमवारी) श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा (Pimpri) रंगला आहे. संपूर्ण देशात हा उत्सव साजरा केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूल तर्फे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त मानवी साखली तयार करण्यात आली होती. यावेळी रॅली देखील विद्यार्थ्यांनी काढली.

ही रॅली सकाळी 8 ते 9 यावेळेत मास्टर माइंड ग्लोबल इंग्लिश स्कूल ते जयदीप पार्क पर्यंत आणि जयदीप पार्क पासून पुन्हा मास्टरमाईंड ग्लोबल स्कूल भोसरी पर्यंत अशी 1 किलोमीटर पर्यंत रॅली काढण्यात आली आहे. या रॅलीमध्ये 900 मुले आणि शिक्षक यांची मानवी साखळी बनवून जय श्रीराम च्या नाऱ्या सहित ही रॅली डॉक्टर प्रदीप नायर यांच्या देखरेखी खाली आयोजित करण्यात आली होती.

Pune : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांची हार्नेक्स कारखान्याला भेट

तसेच या रॅली मध्ये लव्या ट्रान्सपोर्ट ने देखील सहभाग नोंदवला तसेच चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात (Pimpri) आली होती.अशा पद्धतीने श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा प्रचंड उल्हासात साजरा करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.