Pimpri : ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचे प्रात्यक्षिक; मतदान केल्याची मिळणार पावती 

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिनचा वापर केला जाणार आहे. व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीनद्वारे प्रत्येक मतदाराला त्याचे मत कोणाला दिले आहे, याची खात्री करता येणार आहे. या ‘व्हीव्हीपीएट’ मशिनचे आज (गुरुवारी)विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आणि पत्रकार यांच्यासमोर प्रात्यक्षिक करण्यात आले.

महापालिकेत झालेल्या प्रात्यक्षिकावेळी महापौर राहुल जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर, चिंचवड विधानसभा मतदार संघाचे निवडणूक अधिकारी दिलीप गावडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक श्याम लांडे, तुषार कामठे, काँग्रेसचे मयुर जयस्वाल, शेकापचे भालचंद्र फुगे, रामदास मोरे, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश्वर बिजले, विनोद पवार, विश्वास मोरे, विवेक गाडे, तुषार रंधवे ‘एमपीसी न्यूज’चे गणेश यादव उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांसोबतच निवडणूक आयोगाने देखील तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपीएट)मशीन वापरली  जाणार आहे. या नव्या ईव्हीएममुळे मतदारांना मतदान केल्यानंतर पावती मिळणार आहे. सात सेकंद ती पावती मतदाराला पाहता येणार आहे.

शहरात मोबाईल व्हॅनद्वारे मशिनची जनजागृती केली जाणार आहे. महापौर राहुल जाधव आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते ईव्हीएम, व्हीव्हीपीएट मशिन आणि मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला. चिंचवड विधानसभा मतदार संघात उद्यापासून नागरिकांनी मशिनचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार असल्याचे, दिलीप गावडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.