Bhosari : ऍडव्हान्स न दिल्यावरून तरुणाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – ऍडव्हान्स दिला नाही म्हणून चार जणांनी मिळून तरुणाला दगडाने बेदम मारहाण केली. ही घटना साई सर्व्हिस सेंटर फुगेवाडी येथे बुधवारी (दि. 2) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

रोहन राजेश आगेलू (वय 24, रा. उशाकल हाऊसिंग सोसायटी, जुनी सांगवी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सनी भोई, सिद्धार्थ गायकवाड (दोघे रा. दापोडी) आणि त्यांचे दोन मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन यांनी सनी याला ऍडव्हान्स दिला नाही. या कारणावरून सनी याने त्याच्या तीन मित्रांना बोलावून रोहन यांना दगडाने मारहाण केली. यामध्ये सनी जखमी झाले. तसेच आरोपींनी कोयता दाखवून परिसरात दहशत पसरवली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश खारगे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.