Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड प्रमिला गाडे

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनची ( Pimpri ) सन 2023-24 ची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध पार पडली. अध्यक्ष, उपाध्यक्षांसह कार्यकारणीमधील 13 जणांची एकमताने बिनविरोध निवड झाली. ॲड. प्रमिला गाडे यांची अध्यक्ष तर ॲड. गोरख कुंभार यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. बी. के. कांबळे यांनी काम पाहिले.

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी 13 जणांचे अर्ज आले. त्यामुळे त्या सर्वांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ॲड. कांबळे यांनी घोषणा केली. या निवडीमुळे पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनला पहिल्या महिला अध्यक्षा मिळाल्या आहेत.

Maval : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांची दिवाळी गोड

अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे म्हणाल्या, “पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे शहराला अधिकचे कोर्ट मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरवा करावा लागेल.

वकील बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. मोशी येथील जागेत पिंपरी-चिंचवड न्यायालयाच्या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन करून ते काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला ( Pimpri ) जाणार आहे.”

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशनची कार्यकारणी पुढीलप्रमाणे –

अध्यक्ष – ॲड. प्रमिला गाडे
उपाध्यक्ष – ॲड. गोरख कुंभार
सचिव – ॲड. अक्षय केदार
महिला सचिव – ॲड. वर्षा कांबळे
सह सचिव – ॲड. श्रीराम गालफाडे
खजिनदार – ॲड. ऐश्वर्या शिरसाठ
हिशोब तपासणीस – ॲड. संतोषी काळभोर
सदस्य – ॲड. जयेश वाकचौरे
सदस्य – ॲड. तेजस चवरे
सदस्य – ॲड. विशाल पौळ
सदस्य – ॲड. साक्षी धुमाळ
सदस्य – ॲड. गीतावली जाधव
सदस्य – ॲड. नीलम जाधव

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.