Dighi : किरकोळ कारणावरून तरुणाला बियर बॉटल व चाकूने  मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाची वाट बघत कॉलेज गेटवर (Dighi) थांबण्यावरून तीन ते चार जणांनी तरुणाला बियरच्या बाटलीने मारून जखमी केले आहे.ही घटना रविवारी (दि.29) दिघीतील आळंदी रोड परिसरातील ए आय टी कॉलेज गेट समोर घडली.

याप्रकरणी अक्षय उर्फ जोया हजेरी ( वय 23 रा.येरवडा) याने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.फिर्यादी वरून पोलिसांनी मान्य माने व त्याचे 3 साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड प्रमिला गाडे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांच्या मैत्रिणी हे रिक्षाची (Dighi) वाट बघत थांबले होते . यावेळी मान्य माने व त्याचे साथीदार तेथे आले व त्यांनी कॉलेज गेट समोर रिक्षाची वाट पाहत असल्याच्या कारणावरून चिडून हातातील बियरच्या बाटलीने फिर्यादी यांच्या डोक्यात मारून तसेच चाकूने कमरेवर वार करत जखमी केले .

हे भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मैत्रिणींना देखील आरोपीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली .यावरून दिली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल असून पोलीस पुढील तपास करत (Dighi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.