Pimpri : अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्षपदी जितेंद्र कुलकर्णी

एमपीसी न्यूज- अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड शहराची कार्यकारणी जाहीर झाली आहे. जितेंद्र कुलकर्णी यांची पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. ब्राह्मण समाजाच्या व्यावसायिक आणि आर्थिक समृद्धीसाठी महासंघ कार्य करणार आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवडच्या उपाध्यक्ष पदावर पवन वैद्य, दीपक कापसे, धनंजय अंबिके, नीलेश जोशी (राजगुरुनगर), महेश बरसावडे यांची निवड झाली आहे. तर महासचिव म्हणून राहुल कुलकर्णी, निशिकांत दीक्षित, सुधीर राईलकर (लोणावळा) हे काम पाहणार आहेत.

सचिव म्हणून शामकांत कुलकर्णी, विष्णु नायगावकर, ऐश्वर्य मुळे, हेमंत मोघे, विनायक कुलकर्णी, महेश बारसावडे, शैफाली खळे, स्वाती जोशी, कोषाध्यक्ष गणेश टाकसाळे, महिला शहर संघटक उत्कर्षा कुलकर्णी, ब्रह्मोद्योग आघाडी अध्यक्ष संदीप वांजपे, वकील आघाडी अध्यक्ष आदिती राजश्री यांची निवड झाली आहे.

पराग पाथ्रडकर, रोहन रावेरकर, प्रमोद कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, अनया देशपांडे, अपूर्वा बेलवलकर, स्नेहा कुलकर्णी, नीला शिधये, सुनीता शिधये, जयवंत दत्तात्रय देशकर (लोणावळा), दत्तात्रय रवींद्र खिरे (लोणावळा), घनःशाम विवेक पेठकर (लोणावळा) यांची कार्यकारणी सदस्य म्हणून निवड झाली आहे. सल्लागारपदी सतीश आचार्य, सचिन कुलकर्णी, गोपाळ भसे, गोपाळ कळमकर, प्रशांत चौधरी यांची निवड झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.