Pimpri : संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त मंगळवारी भीमगीतांचा कार्यक्रम

एमपीसी न्यूज – भगवान गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीमहोत्सवानिमित्त मंगळवारी दि. 21 मे रोजी सायंकाळी सहा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील पटांगणावर महाराष्ट्राचे सुप्रसिध्द गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा व प्रबोधनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती माजी नगरसेवक व जयंती महोत्सवाचे आयोजक शेखर ओव्हाळ यांनी दिली.

यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, युवा नेते पार्थ पवार, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार अण्णा बनसोडे, विलास लांडे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन , वरीष्ठ पोलीस निरिक्षक अनिल जाधव, दिपक निकाळजे, नानासाहेब गायकवाड आदी उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे, रोहित काटे, जावेद शेख, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, युवा उद्योजक गिरीष जाचक, सुशांत केंजळे यांच्यासह संदीप ढेरंगे, गणेश कदम आदींनी सहभाग घेतला आहे. अशी माहिती शेखर ओव्हाळ यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.