Nigdi : निगडी उड्डाणपुलाजवळ पाइपलाइन फुटली ; पाणी टंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी

यमुनानगर परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत

एमपीसी न्यूज- निगडी येथील दिवंगत मधुकरराव पवळे उड्डाणपुलाजवळ आज सकाळी ६ वाजता पाण्याची पाइपलाइन फुटून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यावर सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. या घटनेमुळे यमुनानगर परिसराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे अशी माहिती नगरसेवक सचिन चिखले यांनी एमपीसी न्यूजशी बोलताना दिली. सध्या शहरामध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. अशा पाणी टंचाईच्या काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी झाल्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून वाहनचालक कशीतरी वाट काढत निघाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.