Pimpri : खासदार श्रीरंग बारणे यांच्या शहरातील शिवजयंती उत्सवांना भेटी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण राज्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मावळ लोकसभा मतदार संघात येणा-या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध शिवजयंती उत्सव मंडळांना मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी भेटी दिल्या.

चिंचवडगाव मधील काळभैरवनाथ उत्सव समिती, जाणता राजा सार्वजनिक शिवजयंती उत्सव, श्री विश्वेश्वर ज्ञानदीप मंडळ बीजलीनगर, एम्पायर इस्टेट मित्र मंडळ शिवजयंती उत्सव, धर्मरक्षा समिती खराळवाडी, स्वराज्य मित्र मंडळ, भक्ती-शक्ती ग्रुप, पिंपरी गाव शिवगर्जना शिवजयंती मंडळ, अखिल पिंपरीगाव शिवजयंती उत्सव, नगरसेवक प्रमोद कुटे युवा मंच व श्रीरंग कला दर्पण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या रांगोळी प्रदर्शनास भेट दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष मावळ गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे, शर्मिला बाबर आदी उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मावळ प्रांत हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला प्रांत आहे. शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन येत्या सतराव्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. पुढील काळात सर्वसामान्य नागरिकांसाठी कामे करून शिवाजी महाराजांचे सुराज्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.