Pimpri: स्थायी समितीची 97 कोटींच्या विकासकामांना मंजुरी

एमपीसी न्यूज – पिंपरीतील इंदिरा गांधी रेल्वे उड्डाणपुलाची दुरूस्ती करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 8 कोटी 11 लाख रूपयांच्या खर्चाससह शहरातील विविध 97 कोटी रुपयांच्या विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा आज (बुधवारी) पार पडली. सभापती विलास मडिगेरी सभेच्या अध्यक्षस्थानी होते. विषयपत्रिकेवरील 31 विषयांना मंजुरी देण्यात आली. चार विषय तहकूब करण्यात आले आहेत.

पुणे-आळंदी रस्त्यापासून चऱ्होली लोहगाव हद्दीपर्यंतच्या विकास आराखड्यतील रस्त्यांचे उर्वरित कामे करणे ( 36 कोटी 38 लाख), मोरवाडी, म्हाडा येथील संपूर्ण रस्ते स्मार्ट वार्डच्या धर्तीवर अद्यावत पद्धतीने सिमेंट कॉंक्रीटीकरण करणे (7 कोटी 96 लाख), वडमुखवाडी गावठाण ते चऱ्होली गावठाण पर्यंतचा 18 मी.डी.पी.रस्ता विकसित करणे (1 कोटी 25 लाख), मामुर्डी परिसरामध्ये वार्षिक ठेकेदारी पद्धतीने ड्रेनेज लाईन व चेंबर्सची देखभाल दुरुस्ती करणे (43 लाख), प्राथमिक शिक्षण विभागाच्या अस्थायी आस्थापनेवर घड्याळी तासिका तत्वावर शिक्षक नेमणूकीसाठी (58 लाख 64 हजार),

प्रभाग क्रमांक 17 मधील विविध कंपन्या, महापालिकेमार्फत खोदलेले खड्डे चर डांबरीकरणाने दुरूस्ती करणे (29 लाख), प्रभाग क्रमांक 18 मधील मनपा इमारतीची दुरूस्ती करणे (37 लाख), प्रभाग क्रमांक 32 मधील दशक्रिया विधी घाटाचे नुतनीकरण करणे (32 लाख), भोसरी सहल केंद्राचे नूतनीकरण करणे (54 लाख), अजंठानगर व फुलेनगर परिसरात जल:निसारण व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे (35 लाख), प्रभाग क्रमांक 7 परीसरातील स्थापत्य विषयक किरकोळ दुरूस्तीची कामे करणे (27 लाख) अशा 97 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांना स्थायी समितीने मान्यता दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.