Pimpri: स्थायी समितीच्या ऑनलाईन सभेत 219 कोटींच्या खर्चास मान्यता

Approval of expenditure of Rs 219 crore in the online meeting of the Standing Committee : ’गुगल मीट’ द्वारे आठ सदस्य सभेत सहभागी

एमपीसी न्यूज – कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची पहिली ऑनलाईन सभा आज (शुक्रवारी) पार पडली. यामध्ये सुमारे 10 हजार नागरीकांची सीबीसी, ईसीजी, विडाल, सीआरपी, तापमान इत्यादी तपासणीकरीता येणाऱ्या ४० लाख रुपयांच्या खर्चासह इतर विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे 219 कोटी रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. स्थायी समिती सभागृहात झालेल्या या ऑलाईन बैठकीस सभापतींसह आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे उपस्थित होते. तर, ’गुगल मीट’ द्वारे आठ सदस्य सभेत सहभागी झाले.

मार्च 2020 मध्ये लॉकडाउन झाले. त्यामुळे वर्ष 2019-2020 मधील 8 कोटी 88 लाख रुपयांची बिले प्रलंबित होती. ती अदा करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

कोरोना बाधित रुग्ण उपचारादरम्यान मरण पावल्यास त्यासाठी योग्य ती खबरदारी घेवून मृतदेहासंबंधी कामकाज करण्यासाठी 16 स्वतंत्र कर्मचारी 6 महिने कालावधीसाठी नेमण्यात येणार आहेत. त्यासाठी येणा-या 26 लाख 90 हजार रकमेच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

शहरात विविध ठिकाणी गढूळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत असून त्याबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा, अशा सूचना सभापती लोंढे यांनी प्रशासनास केल्या.

तसेच क्वारंटाईन सेंटरमध्ये चांगल्या प्रतीचे जेवण देण्यात यावे, अशा सूचना देखील लोंढे यांनी केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.