Pimpri : स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने मातृ दिन साजरा

एमपीसी न्यूज – 12 मे हा ‘मातृ दिन’.  या दिवसाला खूप महत्त्व आहे. म्हणून खास आईसाठीचा दिवस आपण साजरा करतो. याचे महत्त्व लक्षात घेऊन (दि.12 मे) स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या वतीने चिंचवड पोलीस ठाणे येथे ‘मातृ दिन’ केक कापून साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास वरिष्ठ पोलीस अधिकारी शिंगाडे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आईचे महत्व आणि तिच्या मातृत्वाबाबत आपले मनोगत व्यक्त करून उपस्थित असलेल्या महिलांना मातृ दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सहाय्यक पोलिस अधिकारी रोहिणी शेवाळे यांनीही कार्यक्रमास उपस्थिती लावली.

  • स्वायत्त श्रमिक महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा निर्मला जगताप यांनी आईचे प्रेम व तिचे वात्सल्य याबाबत त्या म्हणाल्या, ‘आई हीच आपली पहिली गुरू व मार्गदर्शक असते. तीच आपल्याला चांगल्या-वाईट गोष्टींची जाणीव करून देते.’ ती कायम मुलांच्या हिताचाच विचार करते, हे सांगत रागिणी मुदलीयार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी महिला पोलिस कर्मचारी शुभांगी बावीस्कर, वर्षा साळुंखे, वर्षा सपकाळ, रूपाली पुरीगोसावी, गंगा केंद्रे व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • दरम्यान, प्रतिष्ठानच्या वतीने मान्यवरांचा सत्कार श्रीफळ देऊन करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्मला जगताप, किर्ती नाईक, उर्मिला चवरे, रागिनी मुदलीयार, सुरेखा वाडेकर, निरजा देशपांडे तसेच उदय वाडेकर यांनी सहकार्य केले. सर्व उपस्थितांचे किर्ती नाईक यांनी आभार मानले. कार्यक्रमाची प्रस्तावना निरजा देशपांडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.