Pimpri: भाजपच्या भीमा बोबडे यांची बंडखोरी; भरला अपक्ष अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये शिवसेनेला सुटल्याने भाजपच्या दोन इच्छुकांनी काल बंडखोरी केली असताना आज त्यामध्ये भर पडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी देखील बंडखोरी केली असून आज (शुक्रवारी) त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजप इच्छुकांनी बंडखोरी केली आहे.

माजी नगरसेवक भीमा बोबडे यांनी शक्तीप्रदर्शन करत आकुर्डीतील डॉ. हेडगेवार भवन येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली इंदाणी- उंटवाल यांच्याकडे अर्ज सादर केला आहे. बोबडे तात्या जवळकर, नाना वारे, नंदू भोगले, महादेव कवितके उपस्थित होते.

उमेदवारी दाखल केल्यानंतर बोबडे म्हणाले, भाजपचा निष्ठावंत आणि जुना कार्यकर्ता आहे. 2009 पासून पक्षाकडे उमेदवारीची मागणी करुन देखील संधी दिली नाही. युतीमध्ये शिवसेनेला मतदारसंघ सोडण्यात आला. त्यामुळे आपण अर्ज दाखल केला आहे. अत्यंत ताकदीने निवडणूक लढविणार आहे. निवडून येईल असा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.