Pimpri : भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरवर टाकला बॉम्ब, भाजपचा जल्लोष

एमपीसी न्यूज – भारतीय वायूसेनेच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी आज (मंगळवारी)पहाटे साडे तीनच्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर 1000 किलोचे बॉम्ब फेकले. या कारवाई निमित्त वायुसेनेचे अभिनंदन करत भाजपने जल्लोष साजरा केला.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी-चिंचवड शहर भाजपने जल्लोष केला. यावेळी महापालिकेच्या ‘अ’ प्रभागाच्या अध्यक्षा अनुराधा गोरखे, ‘फ’ प्रभागाच्या कमल घोलप, भाजपचे ज्येष्ठ नेते महेश कुलकर्णी, प्रवक्ते अमोल थोरात, राजेश पिल्ले, नगरसेवक माऊली थोरात, संजय मंगोडेकर, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक राजेंद्र गावडे, सागर आंगोळकर, माजी महापौर आर.एस.कुमार, माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, प्रभागाचे स्वीकृत सदस्य राजू सावंत, वैशाली खाड्ये, आशा काळे, मधुकर बच्चे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.