BNR-HDR-TOP-Mobile

Pimpri : ‘ब्रह्मकेसरी’तर्फे राज्यातील पंधरा आमदारांना उत्कृष्ट विधायक पुरस्कार जाहीर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – राज्यातील पंधरा आमदारांना ब्रह्मकेसरी सांस्कृतिक पत्रिकेच्या वतीने ‘उत्कृष्ट विधायक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती ब्रह्मकेसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिराळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुरस्कार विजेत्यांमध्ये श्रीमती यशोमती (तिवसा), बच्चू कडू (अचलपूर), बाळासाहेब थोरात (संगमनेर), उदय सामंत (रत्नागिरी), लक्ष्मण जगताप (चिंचवड), महेश लांडगे (भोसरी), राहुल पाटील (परभणी), सीमा हिरे (नाशिक), गोवर्धन शर्मा (अकोला), सुधीर गाडगीळ (सांगली), संगीता ठोंबरे (केज), विजय गावित (नंदुरबार), जयदत्त क्षीरसागर (बीड), राहुल कुल (दौंड), हर्षवर्धन जाधव (कन्नड) यांचा समावेश आहे.

  • भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात रविवार दि. 23 जूनला सायंकाळी पाच वाजता हा पुरस्कार वितरण होणार आहे . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब्रह्मकेसरीचे संपादक गोविंद कुलकर्णी असणार आहेत. पुरस्कार वितरण ब्रह्मकेसरीचे मुख्य संपादक पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, खासदार अमोल कोल्हे, अमर साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. ज्येष्ठ उद्योजक श्रीकांत बडवे, बडोद्याचे आमदार शैलेशभाई मेहता, पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव, नगरसेवक रवी लांडगे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुभाष तिवारी, राष्ट्रीय सरचिटणीस सुब्रमण्यम शर्मा, ब्रह्मकेसरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिराळकर आदी उपस्थित राहणार आहे.

  • शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचविण्यात स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांची भूमिका महत्वाची ठरते. नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे कायम तत्पर असतात. त्यांच्या या समाजातील कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने पंधरा आमदारांना उत्कृष्ट विधायक पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती यांनी दिली.

HB_POST_END_FTR-A1
.