Pimpri : …तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या पुतळ्याचे दहन, मित्र पक्ष भाजपचा इशारा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी (Pimpri) अकलेचे तारे तोडून रावण दहनावर बंदी घाला असे विधान केले आहे. त्यांनी श्रीलंकेत स्थायिक होऊन रावणाची पूजा करावी. या विधानाबाबत तत्काळ माफी न मागितल्यास मिटकरी यांच्या पुतळ्याचे महाराष्ट्रभर दहन करण्याचा इशारा भाजपचे पिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखे यांनी दिला आहे.

गोरखे यांनी म्हटले आहे की, आमदार अमोल मिटकरी यांनी अकलेचे तारे तोडून रावण दहना वर बंदी घाला असे विधान केले आहे. खर तर रामायनातील संपूर्ण वानर सेना ही मागासवर्गीय वंचित,सर्व समाजातील होती, यांचा उत्तम उल्लेख श्रेष्ठ वाल्मिकी ऋषी यांनी केला असताना याच सर्व समाजाच्या यशाला काळीमा फासण्याचा प्रकार अमोल मटकरी यांनी केला आहे.
राज्यात रावण दहनाच्या प्रथेवर बंदी आणण्याची मागणी आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारकडे केली आहे. आगामी हिवाळी अधिवेशनात यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितले.

Pune Sangharsha Yatra : यापुढे संघर्ष यात्रेमुळे सरकार तरुणांचे प्रश्न दुर्लक्षित करणार नाहीत – शरद पवार

वाल्मिकी ऋषींनी लिहिलेल्या रामायणाला चॅलेंज देण्याचा प्रकारच खरं तर अमोल (Pimpri) मिटकरी करत आहेत. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून सर्व जनतेच्या आणि खास करून वंचित ,मागासवर्गीय जनतेच्या भावना दुखावणारा आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो. अशा प्रकारची मागणी आपण पुन्हा त्यांनी केली तर संपूर्ण महाराष्ट्रभरात आंदोलन उभे करून ठिकठिकाणी त्यांचाच पुतळ्याचे दहन करण्यात येईल असा इशारा अण्णाभाऊ साठे महामंडळाचे माजी अध्यक्ष व भाजपा पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे यांनी दिला केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.