Pimpri : नातेवाईकातील जुन्या भांडणातून कोयत्याने धाक दाखवत गाड्यांची तोडफोड

एमपीसी न्यूज – नातेवाईकांमध्ये असलेल्या जुन्या भांडणातून कोयत्याचा धाक (Pimpri) दाखवून धमकी देत रस्त्यावर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. हा प्रकार पिंपरीतील गांधीनगर परिसरात सोमवारी (दि.7) रात्री घडला.

Pimpri : पिंपरी-चिंचवड आयडॉल स्पर्धा; पियुष भोंडे ‘मोरया करंडक’ चा महाविजेता

याप्रकरणी महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी संतोष अलकुंटे (वय 19)  व कृष्णा तीमप्पा निराळे (वय 22 ) दोघे राहणार पिंपरी यांना अटक केली असून एक विधी संघर्ष बालक, रोहित, आजा गवांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे आरोपी हे नातेवाईक आहेत त्यांच्यात जुना वाद होता. याच रागातून आरोपी हातात कोयते घेऊन फिर्यादीच्या घरात आले व त्यांनी फिर्यादीला व त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी त्यांनी मोबाईल फोडून त्याचे नुकसान केले. तसेच पर्समधील रोख तेराशे रुपये व चांदीच्या दोन अंगठ्या असा ऐवज धाक दाखवून चोरून नेला.

तसेच कोयत्याने घराच्या दरवाजाची व रोडवर पार्क केलेल्या गाड्यांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत (Pimpri) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.