Pimpri : ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये रंगली आंतरशालेय एक्सटेम्पोर स्पर्धा

एमपीसी न्यूज – ग्लोबल इंटरनॅशनल स्कूलमध्ये 5 ऑगस्ट रोजी इ. 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांमध्ये आंतरशालेय ( Pimpri) एक्सटेम्पोर स्पर्धा रंगली होती. एक्सटेम्पोर ही अशीच एक पद्धत आहे जी विद्यार्थ्यांना केवळ स्वतःचा विचार करण्यासच नव्हे तर त्यांच्या सर्जनशील कल्पनांना अचूकपणे मांडण्यातही मदत करते. ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूल नेहमीच त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भरभराट करत असते.

या स्पर्धेचा उद्देश विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि उत्तम वक्ते बनवणे हा होता जेणेकरून ते निर्भयपणे आपले मत व्यक्त करू शकतील. स्पर्धेची सुरुवात उद्घाटन समारंभाने झाली, त्यानंतर न्यायाधीश संध्या ढोले,. रिता संधू, विजया यशवंत लेंभे, GTIS चे व्यवस्थापक डॉ. स्वप्नाली धोका, प्राचार्या विद्युत सहारे, पालक व विद्यार्थी यांचे स्वागत झाले. लिन्सी बिनॉय आणि कीर्ती महाजन यांनी न्यायाधीशांबद्दल थोडक्यात परिचय करुन दिला.

संध्या ढोले या परिक्रमा नावाच्या विद्यार्थ्यासाठी स्वतःची कौशल्य विकास शाळा चालवतात आणि त्यांना शैक्षणिक क्षेत्रातील 20 पेक्षा अधिक वर्षांचा अनुभव आहे. रीटा संधू यांनी प्रख्यात CBSE शाळांमध्ये मुख्याध्यापिका म्हणून काम केलेले आहे. सध्या ते GRG परवरिश नावाचे स्वतःचे पूर्व प्राथमिक शाळा चालवत आहेत. विजया लेंभे या वैदिक गणिताच्या शिक्षिका आणि विजया शैक्षणिक संस्थेच्या मालक आहेत.

Pimpri : नातेवाईकातील जुन्या भांडणातून कोयत्याने धाक दाखवत गाड्यांची तोडफोड

यानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्पर्धेचे नियम समजावून सांगण्यात आले. स्पर्धा 2 वेगवेगळ्या गटात घेण्यात आली. गट 1 इयता 5, 6 ,7 आणि गट 2 इयत्ता 8, 9, 10 सर्व विद्यार्थ्यांना ठेवलेल्या भांड्यातील एक चिठ्ठी निवडून लिहिलेल्या विषयावर भाषण सादर करायचे होते. विद्यार्थ्यांना 3 मिनिटांची वेळ देण्यात आली होती आणि निर्णयाच्या निकषांमध्ये आत्मविश्वास, स्वर, सादरीकरण आणि उच्चार यांचा समावेश होता.

विद्यार्थ्यांनी आपले विचार आत्मविश्वासाने मांडले. एक्सटेम्पोर स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना केवळ उत्स्फूर्त विचार करण्यामध्येच नव्हे तर त्यांच्या सर्जनशील कल्पनांना अचूकपणे मांडण्यात मदत करण्याचा एक उत्कृष्ट मार्ग दिला. सदर स्पर्धेसाठी एकूण 130 विद्यार्थ्यांचा सहभाग होता. या स्पर्धेसाठी श्री श्री रविशंकर विद्या मंदिर, एसएनबीपी चिखली, किड्स पॅराडाईज, अ‍ॅकॅडमिक हाइट्स, मास्टरमाइंड, बीकन हायस्कूल, प्रियदर्शनी मोशी आणि ग्लोबल टॅलेंट इंटरनॅशनल स्कूलच्या मुलांनी भाग घेतला.

पूनम शेलकर यांनी विद्यार्थ्याना विश्रांती व विरंगुळा म्हणून काही खेळांचे आयोजन केले. बक्षीस वितरण समारंभ, न्यायाधीश आणि व्यवस्थापन यांच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. त्यांनी सर्व विदयार्थ्यांचे परिश्रम, मेहनत आणि मनाच्या उपस्थितीबद्दल त्यांचे कौतुक केले. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे आभार प्रणाली यांनी ( Pimpri) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.