_MPC_DIR_MPU_III

Pimpri : बच्चे कंपनी घेताहेत उद्यानात खेळण्याचा आनंद; उद्यानात वाढतेय गर्दी

एमपीसी न्यूज – शाळांना सुट्या असल्याने आणि बालगोपाळांना अभ्यासाचे टेन्शन नसल्याने, नुसती मौजमजा करण्यासाठी कुटुंबियांसोबत उद्यानात गर्दी होत आहेत. उन्हाळी सुट्यानिमित्त उद्याने गजबजू लागली आहेत. सायंकाळी बाहेर पडलेले बालगोपाळ रात्री उशिरापर्यंत उद्यानात रमताना दिसत आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

शहरात महापालिकेची विविध उद्याने आहेत. निगडीतील भक्ती-शक्ती, दुर्गा देवी, थेरगाव बोट क्‍लब, लक्ष्मीबाई बारणे, संभाजीनगर बर्ड व्हॅली, बहिणाबाई उद्यान, भोसरी सहलकेंद्र, वाकडमधील सावित्रीबाई फुले उद्यान, गुलाबपुष्प उद्यान, वीर सावरकर, ज्ञानज्योती, राजर्षी शाहू उद्यान आदी उद्याने नागरिकांसाठी आकर्षण आहेत.

  • सायंकाळी पाच ते आठ यावेळेत उद्यानांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. उद्यानांमध्ये सायंकाळच्यावेळी सुट्टीच्या कालावधीत बालचमू सी-सॉ, घसरगुंडी, झोका, शिडी आदी खेळांचा आनंद लुटत आहेत. विरंगुळा म्हणून आजही उद्याने चिमुकल्यासाठी वरदान ठरत आहेत.

उद्यानांमध्ये असणारे झोपाळे, घसरगुंडीसह विविध खेळण्यांचा आधार घेत बालगोपाळ मजा करत आहेत. बागेमध्ये फेरफटका मारणे, भेळ, चणे, पॉपकॉर्न, वडा-पाव व अन्य खमंग पदार्थांचा उद्यानामध्ये बसून आस्वाद घेतला जात आहे.

  • शहरातील मैदानी खेळ लुप्त झाले तरीदेखील उद्यानामुळे मुलांना खेळण्याचा आनंद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहर म्हणजे उद्यानाचे शहर आहे. जवळपास शहरातील प्रत्येक मोक्‍याच्या ठिकाणी एक तरी उद्यान आहे. शनिवार व रविवारी या पालकांना सुटी असलेल्या दिवशी गर्दीत वाढ होत आहे. शहरातील ठराविक उद्यानांमध्येच नागरिक गर्दी करताना दिसत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1