Chinchwad Theft: सार्वजनिक ठिकाणी लावलेली मशिन चोरीला

एमपीसी न्यूज : सार्वजनिक ठिकाणी लावलेली काँक्रेट लिफ्ट मशीन चोरट्यांनी चोरून नेली. (Chinchwad Theft) ही घटना मंगळवारी (दि. 26) सकाळी वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे उघडकीस आली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जावेद अल्लाबक्ष बागवान (वय 32, रा. बिजलीनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे दोन लाख रुपये किमतीची काँक्रेट लिफ्ट मशीन आहे. (Chinchwad Theft) ती लिफ्ट मशीन फिर्यादी यांनी वाल्हेकरवाडी येथील हनी किडस शेजारी असलेल्या सार्वजनिक जागेत लावली होती. सोमवारी (दि. 25) सायंकाळी सात ते मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांची लिफ्ट मशीन चोरून नेली. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.