Alandi News: आळंदीत श्रावण मासारंभ निमित्त ग्रामदैवतांना जलाभिषेक

एमपीसी न्यूज: आषाढ आमावस्ये नंतर श्रावण महिन्याला सुरवात झाली आहे. (Alandi News) त्यामुळे आळंदी येथे आज श्रावण मासारंभ निमित्त सकाळी श्रीसिद्धेश्वर,काळभैरवनाथ, शितळा देवी,लक्ष्मी माता,श्री खंडोबा,हजेरी मारुती व शनी मारुती या गावातील ग्रामदैवतांना ग्रामस्थांकडून जलाभिषेक करण्यात आला.
काही नागरिक वर्षभर गावातील मंदिरात जलाभिषेक करत असतात.परंतु चातुर्मासा पैकी एक श्रावण महिना आज चालू झाल्याने बहुत करून ग्रामस्थ नागरिक महिनाभर या श्रावण महिन्यात गावातील विविध दैवतांना जलाभिषेक करत असतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू धर्मात परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे.

 तसेच श्रावण महिन्यात सण -समारंभ मोठ्या प्रमाणात असतात. (Alandi News) स्वत्वाच्या बोधाचे प्रतीक म्हणून श्रावण महिन्याकडे पाहिले जाते. या महिन्यात घरोघरी श्री नवनाथ भक्तीसार , शिवलीलामृत, हरि विजय, भक्ती विजय,  पांडव प्रताप, दासबोध इ.ग्रंथाचे वाचन व श्रवण केले जाते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.