Crime News : दागिने बघण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावली

एमपीसी न्यूज –  आईला देखील असेच दागिने करायचे आहेत म्हणत दगिने बघण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय महिलेची बोरमाळ हिसकावून नेली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी नवी सांगवी येथील विनायक नगर येथे घडली.

याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या राहत्या इमारतीचा जिना झाडून घेत होत्या. इमारतीच्या खाली बोळीत झाडून घेत असताना 25 ते 30 वर्ष वयोगटातील एकजण फिर्यादीजवळ आला. तूप घेता का असे त्याने म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी नकार दिला. त्यानंतर आरोपीने तुमच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ दाखवा. मला माझ्या आईला अशीच बोरमाळ करायची आहे, असे म्हटले. त्यावर फिर्यादी यांनी पदर बाजूला करून बोरमाळ दाखवली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या गळ्यातील ८० हजारांची बोरमाळ हिसका मारून तोडून नेली. फिर्यादी यांना घाबरल्याने ओरडता येईना. त्यामुळे त्यांनी काही अंतर आरोपीचा पाठलाग केला. मात्र आरोपी त्याच्या साथीदाराच्या दुचाकीवर बसून पळून गेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.