Pimpri-Chinchwad Visarjan : विसर्जनासाठी महापालिका सज्ज; 26 घाटांवर तयारी पुर्ण

एमपीसी न्यूज : दहा दिवस लाडक्या बाप्पाची मनोभावे सेवा केल्यानंतर उद्या (शुक्रवारी) लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची तयारी सुरु झाली असून महापालिका विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. (Pimpri-Chinchwad Visarjan) गणेश विसर्जनासाठी शहरातील 26 ठिकाणी सज्जता केली आहे. पवना, इंद्रायणी, मुळा नदीसह शहरातील प्रमुख दहा गणेश विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह सुसज्ज रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आली आहे. तसेच या घाटांसह इतर घाटांवर जीवरक्षक, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि  सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे.

शहरात यंदाचा गणेशोत्सव आनंदात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध सेवा सुविधा पुरवण्यात येत आहेत.(Pimpri-Chinchwad Visarjan) निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव, वाल्हेकरवाडी मधील जाधव घाट, काळेवाडी मधील स्मशान घाट, पिंपळे गुरव घाट, वाकड गावठाण घाट, मोशी नदी घाट, चिखली स्मशान घाट, थेरगाव पूल नदी घाट, सुभाषनगर पिंपरी घाट आणि सांगवी येथील वेताळबाबा मंदिर घाट याठिकाणी वैद्यकीय साहित्य, औषधे आणि सुसज्ज रुग्णवाहिकेसह  वैद्यकीय पथक तैनात ठेवले जाणार आहे.

या वैद्यकीय पथकामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्टाफ  नर्स, ब्रदर, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका वाहनचालक सफाई कामगार आदींचा समावेश आहे. गणेश विसर्जनाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथक कार्यरत राहील, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Pune Ganeshotsav News : गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुण्यात दारु विक्री बंद

गणेश विसर्जन घाटांवर विसर्जन हौद उभारण्यात आले असून स्वयंसेवी संस्थांमार्फत मूर्ती संकलन देखील केले जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी नागरिकांना महापालिकेच्या वतीने आवाहन केले जात आहे. नागरिक देखील या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.(Pimpri-Chichwad Visarjan( अग्निशमन विभागाच्या वतीने शहरातील 26 विसर्जन घाटांवर लाईफ जॉकेट, रिंग, गळ, बोट, मेगा फोन, दोरी अशा रेस्क्यू साहित्यासह  ग्निशमन पथक तैनात करण्यात आले आहे. क्षेत्रीय कार्यालयांमार्फत देखील व्यवस्था करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.