Pimpri : सिटीराईझ सी. एम. ए. फुटबॉल लिग 2018 उत्साहात

एमपीसी न्यूज- दि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकौन्टन्टस् ऑफ इंडिया- पिंपरी-चिंचवड-आकुर्डी चॅप्टरतर्फे सिटीराईझ सी. एम. ए. फुटबॉल लिग 2018 स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

सॉकर यार्ड, चिंचवड येथील मैदानावर भरविण्यात आलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन मॅनेजिंग कमिटी मेंबर्स सी.एम.ए. आशिष देशमुख, सी.एम.ए.चंद्रशेखर शहाने, आणि दि इन्स्टिट्युट ऑफ कॉस्ट अकौन्टन्टस् ऑफ इंडियाच्या पश्‍चिम विभागीय शाखेचे सदस्य सी.एम.ए. नीरज जोशी यांच्या हस्ते झाले.

पश्‍चिम विभागाच्या वेगवेगळ्या चॅप्टरच्या एकूण 13 संघानी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी विजेत्या रोख 25 हजार व चषक तसेच उपविजेत्या संघाला रोख 10 हजार रूपये व चषक पिंपरी चिंचवड आकुर्डी चॅप्टरचे माजी अध्यक्ष सी.एम.ए. आशिष देशमुख, अध्यक्ष सी.एम.ए. महेंद्र भोंबे, सेक्रेटरी सी.एम.ए. प्रदीप देशपांडे आणि मॅनेजिंग कमिटी मेंबर सी.एम.ए. चंद्रशखेर शहाने यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.