Pimpri : शहरात डोळे येण्याची साथ नियंत्रणात

एमपीसी न्यूज – पिंपरी (Pimpri) -चिंचवड शहरात डोळे येण्याची साथ नियंत्रणात आली आहे. ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात नागरिकांमध्ये डोळे येण्याचे प्रमाण घटले आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत 96 रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिन्यात हे प्रमाण पाच हजारांच्या आसपास होते. त्यामुळे ही साथ आटोक्यात आल्याची चिन्ह असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Alandi : सोळू खिंडी जवळील पत्र्याच्या दुकानांना आग

जुलैमध्ये आळंदी येथून सुरू झालेल्या डोळे येण्याच्या साथीचा ऑगस्टमध्ये शहरात वेगाने प्रसार झाला. याचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये अधिक असल्याने याचा संसर्ग मुलांना जास्त प्रमाणात झाला होता. त्याचा अटकाव करण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांमध्ये संसर्गाचा प्रसार होऊ नये यासाठी शाळांमध्येही तपासणी केली जात होती.

मात्र, लहान मुलांमध्ये असणाऱ्या संसर्गाचा प्रसार मोठ्यांमध्येही झाल्याने ऑगस्टमध्ये डोळे आलेल्या रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला. परंतु, गेल्या महिन्याच्या तुलनेने या महिन्यात डोळे येण्याच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. डोळे आलेले रुग्ण बरे होण्याची संख्याही अधिक प्रमाणात आहे.

सर्दी-खोकला, तापाच्या रुग्णांमध्ये वाढ

वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. सर्व वयोगटांमध्ये सर्दी खोकल्याबरोबरच तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. हवामान बदलांचा परिणाम रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांवर लगेचच दिसून येतो. त्यामुळे अशा वातावरणात सर्दी-खोकल्याचा संसर्ग होतो.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.