Pimpri Corona Update : शहरात आज 185 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज, 172 नवीन रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 172 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 185 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरात आजमितीला एकूण 912 सक्रिय रुग्ण आहेत.

शहरातील 1 आणि महापालिका हद्दीबाहेरील 3 अशा 4 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 349 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 65 हजार 177 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. सध्या 912 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 233 रुग्ण गृहविलगीकरणात असून 679 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 420 आहेत. आज दिवसभरात 5 हजार 611 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. आजपर्यंत 11 लाख 33 हजार 365 जणांनी लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.