Pimpri Corona Update: शहरात आज नवीन 218 रुग्णांची नोंद; 850 कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 218 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शनिवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 850 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीबाहेरील एका रुग्णांचा आज मृत्यू झाला. आजपर्यंत शहरातील 4 हजार 608 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 56 हजार 929 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 3 हजार 96 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 2 हजार 945 रुग्ण गृहविलगीकरणात असून 151 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 76 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 915 आहेत. आज दिवसभरात 7 हजार 65 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 33 लाख 50 हजार 957 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.