Pimpri Corona Update : शहरात आज 41 नवीन रुग्णांची नोंद; 62 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड (Pimpri Corona Update) शहराच्या विविध भागातील 41 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (शुक्रवारी) नोंद झाली. तर, कोरोनामुक्त झालेल्या 62 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 3 लाख 71 हजार 605 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 315 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 303 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

Subodh Vidyalay : स्वर्गवासी मित्रांची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी सूबोध विद्यालयात लावलं मैत्रीचं झाड

तर, 12 रुग्ण महापालिका  रुग्णालयामध्ये दाखल (Pimpri Corona Update) आहेत. आज दिवसभरात 833 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 78 हजार 362 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.