Pimpri Corona Update : कोरोनाचा कहर ! शहरात आज 1248 नवीन रुग्णांची नोंद

'अ' आणि 'ड' क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 197 नवीन रुग्ण सापडले

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शहराच्या विविध भागातील 1248 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली. मागील काही महिन्यातील आजची रुग्णवाढ उच्चांकी आहे. ‘अ’ आणि ‘ड’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत सर्वाधिक 197 नवीन रुग्ण सापडले आहेत.

उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 615 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील दोन जणांचा आज मृत्यू झाला आहे.

पिंपरीतील 58 वर्षीय पुरुष, पिंपळेनिलख येथील 80 वर्षीय महिला, फुगेवाडीतील 94 वर्षीय वृद्ध महिला, लोहगाव येथील 35 वर्षाचा युवक, भांगरवाडीतील 60 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 1 लाख 16 हजार 896 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 1 लाख 7 हजार 96 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1888 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 792 अशा 2680 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 1749 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1506 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत 76 हजार 813 जणांनी कोरोनाची लस घेतली आहे. आज दिवसभरात 3999 लाभार्थ्यांनी लसीकरण करुन घेतले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.