Pune Crime News : व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि घातक शस्त्रांचे फोटो ठेवणे पडले महागात, सराईतासह दोघांना अटक

एमपीसी न्यूज – व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला तलवारी आणि तीक्ष्ण हत्यारांचे फोटो ठेवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतासह दोघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.

अमर लक्ष्मण गायकवाड (वय 23, रा. जनता वसाहत) व भीमा शत्रूघ्न शिंदे (वय 22, वाघजाई मित्रमंडळ, जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसद्वारे गुन्हेगारी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. दरम्यान, दत्तवाडीत दोघेजण व्हॉट्सअप स्टेट्सला तलवारी व घातक हत्यारांचे फोटो ठेवून दहशत निर्माण करत असून त्यांच्याकडे हत्यार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नुसार पथकाने दोघांना अटक केली. त्यांच्याकडील तलवार व पालघन जप्त करण्यात आले आहे. अमर गायकवाड सराईत गुन्हेगार असून काही दिवसापासून तो व्हॉट्सअपला सतत शस्त्राचे फोटो ठेवत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.