Pimpri Crime News : रिक्षाच्या भाड्यावरून ग्राहकाला दगडाने मारहाण

एमपीसी न्यूज – रिक्षाच्या भाड्याच्या पैशांवरून झालेल्या भांडणातून रिक्षा चालकाने (Pimpri Crime News)ग्राहकाला दगडाने मारहाण केली आहे. हा प्रकार  कासारवाडी  येथे 24 डिसेंबर रोजी घडला होता.

याप्रकरणी मिंटू विश्वनाथ यादव (वय 23 रा.भोसरी) यांनी सोमवारी (दि.9) भोसरी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून अज्ञात इसमा विरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Maharashtra News : सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर, पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रिक्षा (एम एच 14 जी.सी.5444) पुणे स्टेशन येथे जात होते. यावेळी आरोपी रिक्षा चालक याने भाड्याच्या पैशावरून फिर्यादी यांना दगडाने मारहाण करत जखमी केले.यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस पुढील (Pimpri Crime News) तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.