Pimpri Crime News : केएसबी कंपनीच्या सर्वरवर सायबर हल्ला; 50 लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील केएसबी कंपनीच्या सर्वरवर सायबर हल्ला झाला. यामध्ये तब्बल 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार 27 फेब्रुवारी 2021 रोजी घडला.

नरेंद्र वसंत देशपांडे (वय 52, रा. वारजे माळवाडी, पुणे) यांनी याबाबत मंगळवारी (दि. 29 जून) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्तीने केएसबी कंपनीच्या सर्वरचा अनधिकृतपणे ॲक्सेस घेतला. कर्मचाऱ्यांचा डाटा असलेल्या सुमारे 150 फाईल करप्ट केल्या. यामुळे कंपनीचे तब्बल 50 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.