Pimpri News : भारतनगर झोपडपट्टी मधून सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त

एमपीसी न्यूज – पिंपरी मधील भारतनगर झोपडपट्टी मधून पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने सव्वा चार लाखांची ब्राऊन शुगर जप्त केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 29) दुपारी करण्यात आली.

डिका सागर थोरात (वय 36), रीना बाबा रणदिवे (दोघे रा. भारतनगर झोपडपट्टी, पिंपरी), स्वामी अण्णा (रा. सायन मुंबई) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. त्यातील डिका हिला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार बाळासाहेब सूर्यवंशी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डिका हिच्याकडे ब्राऊन शुगर असल्याची माहिती अमलीपदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास भारतनगर झोपडपट्टी मधील लक्ष्मी मंदिराच्या जवळ छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांनी डिका हिला ताब्यात घेतले. तिच्याकडून चार लाख 25 हजार रुपये किमतीची 85 ग्रॅम ब्राउन शुगर पोलिसांनी जप्त केली. आरोपीने ही ब्राऊन शुगर विक्रीसाठी स्वतःकडे ठेवली होती. दरम्यान तिची बहीण रिना पळून गेली. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.