Pimpri Crime News : पॉस्कोच्या गुन्ह्यातील जबाब बदलण्यासाठी तरुणीचे अपहरण

एमपीसी न्यूज – पूर्वीच्या दाखल पॉस्कोच्या गुन्ह्यातील जबाब बदलण्यासाठी 19 वर्षीय तरुणीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या चुलतीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार शाहरूख रशीत तांबोळी, शमीना रशीद तांबोळी, रशीद इस्माईल तांबोळी ( सर्व रा. सेनेटरी चाळ, भाजी मंडई जवळ, पिंपरी ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींवर कलम 363, 376 (एन) पोक्सो 3,4 अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याप्रकरणी अपहरण केलेल्या तरुणीचा पूर्वी नोंदविलेला जबाब बदलावा, तसेच तिच्यावर लग्न आणि बलात्कराची सक्ती करता यावी यासाठी तिचे अपहरण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पोलीस उपनिरिक्षक चाटे अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.