Pimpri : सराईत गुन्हेगार मनोज विटकर एमपीडीएखाली स्थानबद्ध; पिंपरी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – सराईत गुन्हेगार मनोज वीटकर याला एमपीडीएखाली एक वर्षाकरता पोलिसांनी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई पिंपरी पोलिसांनी केली. आरोपी विटकर याच्यावर दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

मनोज म्हसुकांत विटकर (वय 27, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे स्थानबद्ध केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विटकर हा पिंपरी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगल, तोडफोड, खंडणी, दहशत पसरवणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे 10 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याच्यावर तीन वर्षे मोक्काखाली येरवडा कारागृहामध्ये रवानगी केली होती.

तेथून सुटल्यानंतर त्याने पिंपरी परिसरात आपल्या गुन्हेगारी कारवायांना पुन्हा सुरुवात केली. यामुळे त्याची परिसरात आणखी दहशत पसरत असल्याने पोलिसांनी त्याला स्थानबध्द करून त्याची रवानगी पुन्हा येरवडा तुरूंगात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.