Pimpri: नाशिक फाटा येथील रॅम्पचा खर्च अभियंत्यांकडून वसूल करा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिक फाटा येथील भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाणपुलाचा मुंबई-पुणे महामार्गावरील रॅम्प चुकीचा ठरल्याने गेल्या सहा वर्षांपासून धुळखात आहे. त्यावरील 14 कोटींचा खर्च पाण्यात गेला असून हा खर्च संबंधित कार्यकारी अभियंत्यांकडून वसूल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी केली आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात वाघेरे म्हटले आहे की, नाशिकफाटा येथे महापालिकेने जागतिक बॅंकेच्या कर्जातून जे. आर. डी. टाटा उड्डाणपूल उभारला आहे. गेल्या 6 वर्षांपासून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर उताराच्या दिशेने उभारण्यात आलेला हा रॅम्प पूर्णपणे चुकला आहे.

उलट दिशेने वाहतूक होणार असल्याने वाहतूक विभागाने या रॅम्पला परवानगी दिली नाही. मात्र, हा रॅम्प मागील सहा वर्षांपासून विनावापर पडून आहे. या रॅम्पवर झालेला 14 कोटी रूपयांचा खर्च तत्कालीन कार्यकारी अभियंता श्रीकांत सवणे यांच्या वेतनातून वसूल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.