१६ सप्टेंबर : दिनविशेष

What Happened on September 16, What happened on this day in history, September 16. See what historical events occurred, which famous people were born and who died on September 16.

१६ सप्टेंबर : दिनविशेष – आंतरराष्ट्रीय ओझोन दिन.

१६ सप्टेंबर – महत्वाच्या घटना

  • १६२०: मेफ्लॉवर जहाजाने साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.
  • १९०८: जनरल मोटर्स कॉर्पोरेशन या कंपनीची स्थापना झाली.
  • १९३५: इंडियन कंपनीज अॅक्ट अन्वये बँक ऑफ महाराष्ट्रची नोंदणी.
  • १९४५: दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याची शरणागती.
  • १९६३: मलायाला स्वातंत्र्य. या देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले.
  • १९६३: झेरॉक्स ९१४ या प्रतिमुद्रक यंत्राचे पहिले प्रात्यक्षिक.
  • १९७५: पापुआ न्यूगिनी ऑस्ट्रेलियापासुन स्वतंत्र झाला.
  • १९८७: ओझोनच्या थराच्या कमीत कमी संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी केली आहे.
  • १९९७: आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राजीव बालकृष्णनचा १०० मीटर धावण्याचा १०.५० सेकंदाचा राष्ट्रीय विक्रम.
  • १९९७: निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बास अली बिराजदार यांना राष्ट्रीय संस्कृत पंडित हा पुरस्कार जाहीर.

१६ सप्टेंबर– जन्म

  • १३८०: फ्रान्सचा राजा चार्ल्स (सहावा) यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑक्टोबर १४२२)
  • १३८६: इंग्लंडचा राजा हेन्‍री (पाचवा) यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)
  • १८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन डॉक्टर आल्ब्रेख्त कॉसेल यांचा जन्म.
  • १८८८: बेंटले मोटर्स लिमिटेड चे डब्ल्यू ओ. बेंटले यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९७१)
  • १९०७: जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक वामनराव सडोलीकर यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९९१)
  • १९१३: रुचिरा या पुस्तकाच्या लेखिका कमलाबाई ओगले यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९९९)
  • १९१६: विख्यात शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर २००४)
  • १९२३: सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यी यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०१५)
  • १९२५: आयर्लंडचे पंतप्रधान चार्ल्स हॉगे यांचा जन्म.
  • १९४२: निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी ना. धों महानोर यांचा जन्म.
  • १९५४: सतारवादक संजय बंदोपाध्याय यांचा जन्म.
  • १९५६: अमेरिकन जादूगार डेव्हिड कॉपरफिल्ड यांचा जन्म.

१६ सप्टेंबर– मृत्यू

  • १७३६: जर्मन शास्त्रज्ञ डॅनियल फॅरनहाइट यांचे निधन. (जन्म: २४ मे १६८६)
  • १८२४: फ्रान्सचा राजा लुई (अठरावा) यांचे निधन. (जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)
  • १९८४: बिकीनि चे निर्माते लुई रायर्ड यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १९८४)
  • १९३२: हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे शास्त्रज्ञ सर रोनाल्ड रॉस यांचे निधन. (जन्म: १३ मे १८५७ – आल्मोडा, उत्तराखंड)
  • १९६५: अमेरिकन अॅनिमेशन चित्रपट निर्माते फ्रेड क्विम्बी यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १८८६)
  • १९७३: पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन.
  • १९७७: हिंदूस्तानी शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे निधन. (जन्म: १३ जुलै १८९२)
  • ९९४: साहित्यिक, नाटककार व पत्रकार जयवंत दळवी यांचे निधन. (जन्म: १४ ऑगस्ट १९२५)
  • २००५: लेसर चे शोधक गॉर्डन गूल्ड यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२०)
  • २०१२: आयमॅक्स चे सहसंस्थापक रोमन कोरियटर यांचे निधन. (जन्म: १२ डिसेंबर १९२६)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.