Pimpri: नगरसेवक संदीप वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस, तीन दिवसांत मागविला खुलासा

Disciplinary notice to corporator Sandeep Waghere, disclosure sought within three days : सभागृह नेते नामदेव ढाके यांनी ही नोटीस  बजावली आहे. 

एमपीसी न्यूज  – महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरांशी वादावादीचे प्रकरण झाल्यानंतर नगरसेवक संदीप वाघेरे यांना भाजपने आता शिस्तभंगाची नोटीस पाठविली आहे. तीन दिवसांत त्यांच्याकडून खुलासा मागविला आहे.

सभागृह नेते नामदेव ढाके यांनी ही नोटीस  बजावली आहे.

सत्ताधारी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी दादागिरी, शिवीगाळ केल्याचा आरोप करत महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर, नर्सनी काल काम बंद आंदोलन केले होते. त्यावरुन भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस बजाविली आहे.

_MPC_DIR_MPU_II

सभागृह नेते नामदेव ढाके म्हणाले, ”नगरसेवक वाघेरे यांना शिस्तभंगाची नोटीस दिली आहे. त्यांच्या डॉक्टरांसोबत वागण्यामुळे पक्षाच्या शिस्तीला बाधा पोहोचली आहे. डॉक्टरांसोबत केलेले वर्तन चुकीचे आहे.

कोविडच्या काळात असे कृत्य करणे योग्य नाही. या काळात डॉक्टरांचे मनोधैर्य वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्या या कृतीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे.

कालपासून भाजप नगरसेवक म्हणून सगळीकडे उल्लेख होत आहे.  यामुळे त्यांना नोटीस बजाविली आहे. त्यांच्याकडून तीन दिवसात खुलासा मागविण्यात आला आहे. यापुढे पक्षाला बाधा होईल असे कृत्य कोणत्याही नगरसेवकाकडून झाल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.