Pimpri : मोबाईल डिस्पेन्सरी व्हॅन द्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’; भारतीय जैन संघटनेचा उपक्रम

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर भारतीय जैन संघटना, फोर्स मोटर्स आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉक्टर आपल्या दारी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमाची संकल्पना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतिलाल मुथा यांची आहे.

या उपक्रमाचे उदघाटन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते  4 एप्रिल रोजी करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. उपक्रमांतर्गत पाच दिवसामध्ये 737 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य जनतेस बाहेर पडणे शक्य नाही. डॉक्टर आपल्या दारी या उपक्रमात सर्दी, खोकला, ताप अशा साध्या आजाराची तपासणी करून त्यावर औषधे देखील दिली जातात.

ज्या भागामध्ये ही व्हॅन जाते तेथे, लाऊड स्पीकरद्वारे अनाउन्समेंट करून रुग्ण तपासणीसाठी बोलावले जाते. या उपक्रमासाठी पिंपरी-चिंचवडचे आयुक्त श्रावण हर्डिकर, प्रमुख वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, महिला वैद्यकीय अधिकारी डांगे यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे.

उपक्रमासाठी भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष विरेश छाजेड, संदेश गादिया, शुभम कटारिया, सुभाषजी ललवाणी, संजय जाधव, अशोक पवार हे विशेष परिश्रम घेत आहे. ज्या प्रभागात या व्हॅनद्वारे तपासणी करायची असेल तेथील सामाजीक संस्था अथवा नगरसेवक यांनी भारतीय जैन संघटना पिंपरी चिंचवड अध्यक्ष विरेश छाजेड यांच्याशी (8379055759) संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.