Pune : कामाच्या पहिल्याच दिवशी महापालिकेत शुकशुकाट

एमपीसी न्यूज – 2020 च्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारीला महापालिकेत कमालीचा शुकशुकाट जाणवत आहे. महापालिका पदाधिकारी कार्यालयासह अधिकाऱ्यांच्या कार्यलयातही वर्दळ कमी असल्याचे चित्र आहे. 31 डिसेंबर पुणेकरांनी धूमधडाक्यात साजरा केला.

एरवी महापालिकेत नागरिकांची कमालीची गर्दी असते. पुणे शहरातील रस्त्यांवरही काही प्रमाणात वाहनांची संख्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले. नवीन वर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक वेगळाच ‘टर्निंग पॉईंट’ असतो. या वर्षाच्या निमित्ताने अनेकजण काहीना काही संकल्प करीत असतात. बहुतेजन नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करीत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.