Talegaon Dabhade : सरस्वती विद्या मंदिरचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

एमपीसी न्यूज- सरस्वती शिक्षण संस्थेच्या सरस्वती विद्या मंदिरमध्ये बालवाडी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. दोन सत्रामध्ये झालेल्या स्नेहसंमेलनाला विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘निसर्ग’ ही ह्या वर्षीच्या स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. सकाळच्या सत्रात इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांनी पाच तत्वे कशी महत्वाची आहेत व आपण त्याकडे दुर्लक्ष केले तर मानवाचा कसा ऱ्हास होईल याचे गीत, भारुड, कीर्तन, नाट्यछटा इत्यादीद्वारे प्रबोधन केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक वृंदा गावडे, पोलीस काॅन्स्टेबल वाबळे, नगरसेविका कल्पना भोपळे, माजी नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी उपस्थित होते.

वृन्दा गावडे यांनी पालकांना संबोधित करताना आपल्या पाल्याचे मित्र बना, त्यांना मोबाईल, गाडी देऊ नका असा सल्ला दिला. तर कल्पना भोपळे यांनी स्वछ सुंदर तळेगावसाठी नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन केले. उमाकांत कुलकर्णी यांनी शाळेच्या उत्कर्षाबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

अहवाल वाचन माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका रेखा परदेशी यांनी केले. तालुका, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पारितोषिके मिळवलेल्या विद्यार्थी व शिक्षक यांना पारितोषिके देण्यात आली. त्याचे वाचन पर्यवेक्षिका सुरेखा रासकर यांनी केले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, खजिनदार सुचित्रा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक डॉ ज्योती चोळकर यांनी केले. सूत्रसंचालन सुनीता कुलकर्णी व कल्याणी जोशी यांनी केले. आभार नितीन शिंदे यांनी मानले.

दुपारच्या सत्रात रेकम कंपनीचे मनुष्यबळ विकास अधिकारी संतोष राव व ज्ञानेश्वर लष्करी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. बालवाडी ते 4 थीच्या अहवालाचे वाचन प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विद्या अडसुळे यांनी केले. पाण्याचा थेंब नी थेंब वाचवा, हिरवा निसर्ग जपून ठेवा, पक्षी प्राण्यांचे संवर्धन करा असा पर्यावरण जपवणुकीचा संदेश या चिमुकल्या मुलांनी आपल्या विविध कला सादर करत प्रेक्षकांना दिला.

यावेळी संस्थेचे कार्यवाह प्रमोद देशक, संस्था सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, इंदोरी बालवाडी प्रमुख अनुराधा बेळणेकर, तळेगाव बालवाडी प्रमुख सोनाली काशीद, इंदोरी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नीता दहितुले, ग्लोबल एंटरप्रायझेसच्या कार्यकारी संचालिका स्नेहल रामाणे तसेच पालकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संतोष राव म्हणाले, ” कोणतेही काम मनापासून करा तुमचा नक्की उत्कर्ष होईल” तर ज्ञानेश्वर लष्करी यांनी शाळेचे व सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
प्रास्ताविक डॉ ज्योती चोळकर यांनी केले .सूत्रसंचालन आशा गायकवाड, सोनल शेटे यांनी केले. विद्यार्थी पारितोषिकाचे वाचन प्रतिभा देवकर यांनी केले. तर आभार पूजा उतेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.