Pimpri : लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा – डॉ. दिलीप गरुड

एमपीसी न्यूज – “लोकसाहित्य हा संस्कृतीचा मोठा ठेवा आहे.तो जतन गरजेचे ( Pimpri ) आहे. असे विचार ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप गरुड यांनी हॉटेल सुरुची सभागृह, नवी सांगवी येथे शनिवारी (दि. 06 जानेवारी )  व्यक्त केले.

धनश्री चौगुले लिखित ‘मौखिक परंपरेतील भाषिक सौंदर्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना डॉ. दिलीप गरुड बोलत होते. ज्येष्ठ योगाभ्यासक जयवंत पाटील, मौखिक साहित्याच्या ज्येष्ठ संकलक सुधाताई पाटील, मुख्याध्यापक सदानंद पाटील, उद्योजक शिवानंद पाटील, साहित्यिक श्रीकांत चौगुले, लेखिका धनश्री चौगुले यांची व्यासपीठावर तसेच साहित्यिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

डॉ. दिलीप गरुड पुढे म्हणाले की, “एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक ( Pimpri ) परंपरेने आलेल्या वाड्.मयाला लोकसाहित्य म्हटले जाते. धनश्री चौगुले यांनी ओव्या, पारंपरिक गीते, उखाणे, हुमान (कूटप्रश्न) अशा साहित्यप्रकारांचे परिश्रमपूर्वक संकलन केले आहे.

Chinchwad : लावणी महोत्सव, काव्य पहाट, लोकनृत्य, एकांकिकेने नाट्य संमेलनाचा दुसरा दिवस गाजवला

वाड्.मयीनदृष्ट्या हे संकलन अमूल्य आहे.” सदानंद पाटील आणि शिवानंद पाटील यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली. यावेळी सुधाताई पाटील यांनी विविध रंगतदार उखाणे व लोकगीते सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद ( Pimpri ) मिळवली.

धनश्री चौगुले यांनी आपल्या मनोगतातून, “मौखिक साहित्याचा खूप मोठा ठेवा माझ्या आजीकडून आईला मिळाला होता. हे संचित लिखित स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून लोकसाहित्याचे सुलभ अर्थासह पुस्तकाच्या माध्यमातून संकलन केले आहे. अशी माहिती देताना स्त्री जाणिवांच्या काही हृद्य ओव्यांचे सादरीकरण करून श्रोत्यांना सद्गदित केले.

कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जयवंत पाटील यांचा सहस्त्रचंद्रदर्शन आणि सुधाताई पाटील यांचा अमृतमहोत्सवानिमित्त सत्कार करण्यात आला. जयवंत पाटील यांनी सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली. माधुरी लवटे यांनी शुभेच्छापर गीतगायन केले. प्रा. प्राजक्ता चौगुले यांनी सूत्रसंचालन केले. प्रतिभा पाटील यांनी आभार ( Pimpri ) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.