Pimpri: वनविभाग आणि सावरकर मंडळातर्फे घोरावडेश्वर डोंगरावर विविध उपक्रम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाचा वनविभाग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे घोरावडेश्वर डोंगरावर तिळगुळ समारंभ, हळदीकुंकू समारंभासह फलक अनावरण असे विविध उपक्रम निसर्ग मित्रांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले.

देहूरोड येथील घोरावडेश्वर मंदिर येथे रविवारी (दि.27) सकाळी सात वाजता अमरजाई माता मंदिर पार्कींगजवळ वनांची काळजी घेण्याविषयी आणि याबाबत अपराध केल्यास होणा-या शिक्षेबाबत जागृती करणा-या फलकाचे अनावरण डॉ. विनोद बन्सल यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

अमरजाई मंदिर व्यवस्थापकनाचे जोशी गुरुजी यांनी पुजन केल्यानंतर वनअधिकारी गायकवाड यांनी श्रीफळ वाढवून पुजा केली. यावेळी मंडळाचे पदाधिकारी विनोद बन्सल, रवी मनकर, लाला माने, दिपक नलावडे, अरविंद खंडकर, भुगोल फौंडेशनचे वाळुंज सर, शकुंतला बन्सल उपस्थित होते.

भास्कर रिकामे यांनी यावेळी सर्वांचे स्वागत करुन हरित घोरावडेश्वर हरित प्रकल्पाची सद्यस्थिती आणि आगामी उपक्रमाची माहिती दिली. यानंतर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने घोरारवडेश्वर डोंगरावर आयोजित केलेल्या तिळगुळ आणि हळदी कुंकू समारंभानिमित्त तिनशेपेक्षा जास्त निसर्गमित्रांनी भेट देऊन हरित घोरावडेश्वर प्रकल्पाची माहिती घेतली. तसेच यापुढे निसर्ग सेवेत सहभागी होण्याचा संकल्प केला. प्रामुख्याने ओम निसर्ग मित्र-चिंचवड, संत गरु रोहिदास बहुउद्दैशीय संस्था, सायकल मित्र, अविरत श्रमदान, भुगोल फौंडेशन, यश अकॅडमी, निर्विकार आयुर्वेद, चला मारु फेरफटका, यांचेसह वनरक्षक सुनील भुजबळ, वनअधिकारी गायकवाड यांच्यासह माजी वनअधिकारी रासने, माजी नगरसेवक विजय लांडे आदी सहभागी झाले होते.

मानकर, सौ. म्हस्के, सौ. मापारी, सौ.रिकामे, सौ. देशमुख, सौ.भोसले, सौ. पाटील , सौ. सावंत यांनी डोंगरावर आलेल्या भगीनींचे हळदीकुंकू , तिळगुळ, मराठी दिनदर्शिका व कापडी पिशवी देऊन स्वागत केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.