Pimpri: महापालिकेत भाजपच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षाला विरोधी पक्षाच्या दोन नगरसेवकांकडून मारहाण?

Pimpri: Former PCMC Standing Committee Member frpm BJP beaten up by two Opposition party corporators. दोन नगरसेवकांनी जबर मारहाण केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीच्या एका माजी पदाधिकाऱ्याला आज (सोमवारी) दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या दोन नगरसेवकांनी जबर मारहाण केल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे. मात्र मारहाणीचे नेमके कारण गुलदस्त्यात आहे.

कोरोना लॉकडाऊनच्या पुनश्च हरी ओम नंतर आज पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तीन महिन्याच्या तहकूब सभा पार पडल्या. तर, चौथी सभा गणसंख्येअभावी तहकूब झाली. सभा संपल्यानंतर नगरसेवक मुख्य इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर आले.

तिथे भाजपचा स्थायी समितीचा एक माजी पदाधिकारी, राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील एकाच आडनावाचे आणि एकाच प्रभागातून दोन वेगवेगळ्या पक्षातून निवडून आलेले दोन नगरसेवक बंधू एकत्र आले. त्यांच्यात चढ्या आवाजात चर्चा सुरू होती. चर्चेचे रूपांतर हाणामारीत झाले. जोरदार हातपायी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

दरम्यान, मारहाण नेमकी कशावरून झाली हे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. या राड्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.