Pimpri : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात चार हजार पोलिसांचा बंदोबस्त

एमपीसी न्यूज – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान सोमवारी (दि. 29) होणार आहे. प्रशासकीय कामासोबत पोलिसांनी देखील कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. 4 हजार 331 पोलीस निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात तैनात करण्यात आले आहेत.

पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत शिरूर व मावळ मतदारसंघ येतात. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पुणे व पिंपरी पोलीस आयुक्तालयांना भेट देत तेथील आढावा घेतला होता. यावेळी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाने महासंचालकाकडे 3 हजार 127 मनुष्यबळाची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस महासंचालकांनी 2 पोलीस उपायुक्त, 6 सहायक पोलीस आयुक्त, 20 पोलीस निरीक्षक, 50 पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 575 पोलीस कर्मचारी असा एकूण 1 हजार 653 पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा निवडणुकीच्या काळात दिला आहे.  उर्वरित पोलीस बंदोबस्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे.
  • केंद्रीय राखीव दलाची 3 पथके ज्यामध्ये 300 जवानांचा समावेश असणार आहे. तसेच राज्य राखीव दलाची तीन पथके मागवण्यात आली आहेत. बालेवाडी येथे तयार करण्यात आलेल्या स्ट्रॉंग रुमसाठीही अतिरीक्त केंद्रीय राखीव दलाच्या दोन व राज्य राखीव दलाच्या दोन अशा टीम मागवण्यात आल्या आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.