Pimpri : सदनिका भाड्याने घेण्याच्या बहाण्याने घर मालकाची नऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – एका घर मालकाने त्याची सदनिका भाड्याने देण्यासाठी ( Pimpri ) नो ब्रोकर साईटवर जाहिरात दिली. त्या माध्यमातून संपर्क करत अनोळखी व्यक्तीने घर मालकाचा विश्वास संपादन करून सरकारी कामाचे कारण सांगत नऊ लाख रुपये घेत फसवणूक केली. ही घटना 9 ते 11 जुलै या कालावधीत संत तुकाराम नगर, पिंपरी येथे घडली.

Pune : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवस पुणे दौऱ्यावर

प्रवीण सिंग पनवार (वय 35, रा. संत तुकाराम नगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  9124218976,  9394682307 या क्रमांक धारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची एक सदनिका भाड्याने देण्यासाठी नो ब्रोकर या साईटवर जाहिरात दिली. त्याद्वारे आरोपींनी फिर्यादीना संपर्क केला. सदनिका भाड्याने घ्यायची असल्याचे सांगत.

सरकारी काम असल्याचे सांगत सरकारी प्रोसेसच्या नावाखाली फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून नऊ लाख सात हजार 249 रुपये घेत त्यांची फसवणूक केली. पिंपरी पोलीस तपास ( Pimpri ) करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.