Pimpri : शिवसंपर्क अभियान मजबूत करण्याचे खासदार संजय राऊत यांचे आवाहन

एमपीसी न्यूज – शिवसंपर्क अभियानाद्वारे गावोगावी शाखानिहाय भेटी व बैठका घेऊन विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख ते गटप्रमुख स्तरावर पक्ष संघटना मजबुत करा, असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले.

शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेऊन मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये सुरु केलेल्या शिवसंपर्क अभियानाबाबत माहिती दिली. त्यावेळी खासदार राऊत यांनी त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख बाळा कदम, गणेश जाधव, व युवासेना विस्तारक वैभव थोरात उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.