Pimpri : सिरवी समाजाच्या वतीने श्रीराम पूजा मंगल अक्षता कलशाची भव्य शोभायात्रा

एमपीसी न्यूज – आकुर्डी, निगडी प्राधिकरणातील (Pimpri) सिरवी समाजाच्या वतीने आई माता मंदिर परिसरातून श्रीराम पूजा मंगल कलशाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

शोभायात्रेत रथावर आरूढ झालेले बाल श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. झांज, ढोल ताशे वाजवत आबालवृद्धांनी दिलेल्या ‘जय श्रीराम’ च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महिला भाविक पारंपरिक वेषात आणि श्रीरामाची प्रतिमा हातात घेऊन शोभायात्रेत सहभागी झाले होते.

अयोध्येत 495 वर्षांनी 22 जानेवारी 2024 ला ( Pimpri)श्रीरामाची मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानिमित्ताने संपूर्ण देशासह महाराष्ट्रात श्रीराम पूजा मंगल अक्षता कलश दर्शनासाठी आला आहे. मंगल अक्षता कलशातील अक्षतांचे वाटप 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी करण्यात येणार असून 22 जानेवारी श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिनी सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या देव्हाऱ्यातील देवांवर अक्षता वाहून पूजा करून श्रीरामाचा नाम जप करावा असे आवाहन सिरवी समाज आईमाता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा यांनी केले आले.

Pune : जयप्रकाश नारायण यांच्या विचारांची देशाला गरज: डॉ. कुमार सप्तर्षी

 

 

मंगल अक्षता कलशाचे आईमाता मंदिरात आगमन झाल्यानंतर विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली.शोभायात्रेचे नियोजन आणि कलशाचे पूजन सिरवी समाज आई माता मंदिर प्राधिकरणाचे अध्यक्ष मोहनलाल अगलेचा, सचिव रामलालजी लचेटा, माजी अध्यक्ष तेजाराम लचेटा, युवा अध्यक्ष प्रकाश सोलंकी, महिला अध्यक्ष धापूबाई काग, महिला सचिव अनिता जगदीश, लीला परमार यांनी केले होते.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.