Nigdi : पीएमपी बस प्रवासात महिलेची एक लाखाची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज – पीएमपी बसमधून प्रवास करताना (Nigdi)अज्ञाताने प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १४) दुपारी पावणे एक ते दीड वाजताच्या कालावधीत चिखली ते निगडी दरम्यान घडली.

याप्रकरणी प्रवासी महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune : 53 व्या विजय दिवसाच्या स्मरणार्थ ‘सदर्न स्टार विजय दौड 2023’ संपन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी (Nigdi)महिला गुरुवारी दुपारी चिखली ते निगडी असा पीएमपी बसमधून प्रवास करत होत्या. प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील ९७ हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या नकळत चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.