Pimpri: शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी उद्या गटनेत्यांची बैठक

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी उद्या (मंगळवारी) बैठक आयोजित केली आहे. पाणीपुरवठा विभागातील अधिकारी आणि गटनेत्यांची सकाळी 11 वाजता ऑटो क्लस्टर येथे बैठक होणार आहे.

महापौर राहुल जाधव यांच्या अध्यतेखाली ही बैठक होणार आहे. सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, विरोधी पक्षनेते नाना काटे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसेचे सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे आयुक्तांसह पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मागील आठ दिवसांपासून शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यावर महासभेत साडेसात तास चर्चा झाली. शनिवारपर्यंत पाणीपुरवठा सुरळित करण्याचे डेडलाईन देण्यात आली होती. पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यासाठी उद्या गटनेत्यांची बैठक होणार आहे.

त्याचबरोबर स्थापत्य, विद्युत, नागरवस्ती विकास योजना, पिंपरीतील भीमसृष्टीच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. याबाबतची माहिती महापौर राहुल जाधव यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.